नाव - सोमवंशी क्षत्रिय पाठारे / सोमवंशी पाठारे क्षत्रिय
धर्म - हिंदू
व्यवसाय - वादन/नर्तन , शेतीवाडी , शिक्षक, बँक कर्मचारी, इंजिनिअर्स , डॉक्टर्स
रोजचा आहार (जेवण) - भात , भाकरी, चपाती, भाज्या / मासे कालवण, कोंबड्या / बकरा मटण.
लग्न समारंभ - मोठा सोहळा ज्यात सप्तपदी पासून ते कन्यादान सर्व विधी ब्राह्मण च्या सांगण्याप्रमाणे होतात.
लहान मुलांसाठीची जन्मापासूनचे विधी -
जन्मापासून 6 व्या दिवशी होते सटोऱ्या / हटोऱ्या ( षष्ठी पूजन )
बाराव्या दिवशी नामकरण विधी - बारसे
पिठोरी पूजा - बरेचसे आईवडील आपल्या बाळाच्या निरोगी निरामय आयुष्यासाठी दरवर्षी पिठोरी देवी ची पूजा करतात
गुढी पाडवा -
चैत्र महिना ह मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे. मंगलस्नान करावे आणि सुर्वोदयाच्या वेळ म्हणजेच ब्रह्म मुहुर्तावर ही गुढी उभारायची असते. आता गुढी कशी तयार करायची? तर एक उंच काठी घ्यायची. त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी ह्या वस्तू बांधायच्या. त्यावर तांब्या-पितळ्याच्या नाहीतर कास्याचा गडू लावायचा. ही तयार केलेले गुढी दारांत लावायची. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढावी. गुढीची काठी तिथे नीट बांधावी. काठीला गंध, फुलं, अक्षता लावाव्यात. गुढीची पूजा करावी. निरांजन लावावे. उदबत्ती दाखवावी. दुध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवावा. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हां हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.
घरजत्रा - घरातील मोठा मुलगा (एकत्र कुटुंब असेल तर ) घरजत्रा करतो.
दिवाळी -
दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा. धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
मरणोत्तर विधी -
हिंदू धर्मानुसार सर्व विधी होतात.
स्मशानात नेण्याआधी सर्व आप्तस्वकीय घराबाहेर एकत्र जमून मृत व्यक्ती बद्दल चांगले शब्द आणि आठवणी जागवून त्याला शेवटचा निरोप देतात.
त्याचे शेवटचे दर्शन घेतात.
हात जोडून पाया पडतात आणि मग स्मशानात अग्नी किंवा इलेक्ट्रिक दहन केले जाते.
In general, Hindu festivals "are intended to purify, avert malicious influences, renew society, bridge over critical moments, and stimulate or resuscitate the vital powers of nature."
They include a wide variety of rituals, including worship, prayer, processions, magical acts, music, dancing, lovemaking, eating, drinking, and feeding the poor.
Major festivals likely to be observed by most Hindus are:
Holi - Holi (also called Holaka or Phagwa) is an annual festival celebrated on the day after the full moon in the Hindu month of Phalguna (early March). It celebrates spring, commemorates various events in Hindu mythology and is time of disregarding social norms and indulging in general merrymaking. Holi is probably the least religious of Hindu holidays.
Diwali - Diwali, from the Sanskrit word Dīpãvali, meaning "row of lights" is a Hindu festival of lights lasting five days. For many Hindus, Diwali is also New Year's Eve. Diwali is held on the final day of the Vikram calendar, a type of Hindu calendar followed by North Indians.
Mahashivaratri (Shiva Ratri) Mahashivaratri (also called Shiva Ratri) is the Great Festival of Shiva. It is held on the 14th day of the dark half of the lunar month of Phalguna. Mahashivaratri is especially important to Saivites (devotees of Shiva), but it is celebrated by most Hindus.
Other sacred days: -
-
Rama Navami - birthday of Lord Rama (April)
-
Krishna Jayanti - birthday of Lord Krishna (July-August)
-
Raksābandhana - renewing bonds between brothers and sisters (July-August)
-
Kumbh Mela - pilgrimage every 12 years to four cities in India (July-August; last one 2003)
-
Ganesha-Chaturthi (Ganesha Utsava) - festival of Ganesh (August-September)
-
Dassera - victory of Rama over demon king Ravana (September-October)
-
Navaratri - festival of Shakti (in Bengal) or Rama's victory over Ravana (South India) (September-October)