Each day I learned something new from you. Thank you guys for the great efforts put to complete this important piece of work. Your support and inspiration is what motivates me to do my best each day.

Pillars of My Life - Sulu Mavashi, Bhavu, Bhairavi & Mummy
![]() My Mother Priya Thakur माझी आई प्रिया (लता) ठाकूर आमची प्रेरणा स्रोत | ![]() माझे पपा हेमंत बंडू ठाकूर आमच्या आयुष्यातील बेस्ट शेफ My Pappa Mr. Hemant Thakur Best Chef of our Life |
---|---|
![]() पुरुषोत्तम राऊत Purushottam Raut आमचे भाऊ - ह्या वेबसाईट चे करता करविते सर्वस्व | ![]() सुलोचना राऊत Sulochana Raut - माहितीचा खजिना |
![]() साधना चौधरी Sadhana Chaudhary माझी मैत्रीण माझी प्रेरणा | ![]() मयूर म्हात्रे माझा नवरा - माझी प्रेरणा |
![]() अश्विनी आणि राहुल राऊत - Ashwini & Rahul Raut आमचे एडिटर अँड फोटोग्राफर्स Our Editor and Photographers | ![]() भैरवी आणि अतुल माळी Bhairavi & Atul mali - उत्साहाची ख ाण... ह्या वेबसाईट ची जान |
![]() प्रविणा (Praveena) - आमच्या बेस्ट ऑनलाईन शेफ Our Best Online Chef | ![]() प्रतिमा ठाकूर / नाडकर्णी (Pratima Thakur / NAdkarni) - उत्साही ऑनलाईन शेफ Enthusiastic Online Chef |
![]() श्री प्रतीक ठाकूर Our Best Blogger | ![]() Suggested Matrimony column |

This is all about चौकळशी वाडवळ Samaj
What is चौकळशी वाडवळ Samaj
It is an Association of people of Indian origin from the State of Maharashtra, India
Our Vision
To promote the personal and social development of चौकळशी वाडवळ people within the multicultural community worldwide
Our Aim
To create unity within the चौकळशी वाडवळ community worldwide and promote educational, cultural and social activities and introduce our cultural values to the entire world
आपल्या ह्या वेबसाईट चे उदघाटन आम्ही आमच्या सर्वांच्या लाडक्या सुलु मावशी आणि भाऊ ह्यांच्या हस्ते केले आहे.
माझ्या घरातले सर्वात वयस्कर मोठी माणसे म्हणजे आमची सुलु मावशी आणि भाऊ.
माझ्या आई ची आई मनुताई म्हणजे माझी आजी माझ्या आईच्या वयाच्या 5 व्य वर्षी वारली. त्यामुळे आई चे प्रेम माझया सुलु मावशी नेच दिले. आमच्यासाठी आमची आजी म्हणजे सुलु मावशी. मम्मी सुलु मावशी म्हणायची म्हणून आम्हीही सुलु मावशी च म्हणून लागलो.
खर तर ती आमची लाडकी सुलु आजी पण आम्ही तिला सुलु मावशीच म्हणतो. आणि भाऊ म्हणजे आमचे आजोबा आमचे लाडके भाऊ. लहानपणापासून आमच्यावर संस्कार केले असतील तर ते सुलु मावशी भाऊ नीच.
भाऊंची कडक शिस्त असायची. सर्व वस्तू जगाच्या जागीच ठेवायची सवय त्यामुळेच लागली. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना विजेचे बटन बंद करायची सवय त्यांनीच लावली. कुठलीही गोष्ट एकदा हातात घेतली कि ती नीट जाणीव पूर्वक पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असते हे त्यांनीच शिकवले.
सुलु मावशी ने उकडीचे मोदक कसे निगुतीने बनवायचे नाजूक हाताने ते शिकवले.
कोबीची परतून केलेली मस्त भाजी माझ्या अखूप आवडीची ती मी सुलु मावशी कडेच शिकले.
गोडाचा शिरा बनवायला हि मला माझ्या सुलु मावशीनेच शिकवले.
आमच्या लहानपणी शाळेतली आमची अभ्यासाची प्रगती , आम्ही नीट अभ्यास करत आहोत कि नाही याकडे भाऊ आणि सुलु मावशी चे खूप बारकाईने लक्ष असायचे.
सुलु मावशी आणि भाऊ ची दोन्ही मुले मुलगा पराग (पराग मामा ) आणि मुलगी मालविका (बबू मावशी) दोघेही उच्च विद्या विभूषित इंजिनिअर्स. त्यामुळे आम्हाला सतत प्रेरणा असायची कि मामा आणि मावशी सारखे शिकून मोठे व्हायचे.
माझ्या बारावीला ऍडमिशन ला माझा पराग मामाच आला होता. जेव्हा मी कम्प्युटर इंजिनिअर फायनल इयर ची परीक्षा देत होते ठेवा भाऊ आणि सुलु मावशीने मला त्यांच्या घरीच अभ्यास करायला आणले होते. मला वेगळी खोली देण्यात आली होती जिथे मला सर्व हातात मिळत होते . मी फक्त अभ्यास करत होते. भाऊ सतत येऊन जाऊन अधे मध्ये डोकावत असत कि मी ताण तर नाही ना घे , मी खळलंय का नीट, मी नीट आहे का हे बघायला.
मला त्यांचे हे प्रेम आणि काळजी खूप भावली होती मनाला. आणि आजही ते तितक्याच प्रेमाने माझी काळजी करत असतात. मला नोकरी मिळावी म्हणून माझ्या सुलु मावशी आणि भाऊ ने खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या आशीर्वादाने मला पटनी कॉम्पुटर सिस्टम ह्या कंपनीमध्ये खूप छान नोकरी देखील मिळाली. तिथून माझ्या साठी सुलु मावशी भाऊ आणि माझ्या मम्मी 'पपा नि बघितलेली सर्व स्वप्न मी पूर्ण करू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे.
सुलु मावशी स्वताहा कडक शिस्ती ची शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरातच आम्हाला शिस्त पालनाचे धडे मिळाले ज्याचा आम्हाला खूप फायदा होतो आहे .
कामे वेळच्या वेळी करून टाकायची सवय लागल्याने आमच्या ऑफीसा मध्ये हि आम्ही यशस्वी आहोत.
ह्या सर्व व्यक्तींनी ह्या वेबसाईट साठी खूप मदत केल्याने मी सर्वांची खूप आभारी आहे
