top of page

शेवग्याच्या पाल्याची आमटी / Shewga leaves Aamati

  • Pravina Raut Purao
  • Nov 21, 2016
  • 1 min read

शेवग्याच्या पाल्याची आमटी

साहित्य ---- २ वाट्या शेगवाचा पाला, ३ वाट्या वालाचे भिरडे, ४ चमचे आले लसुण व मिरची पेस्ट , हळद २ चमचे , मसाला ३ चमचे , अर्धा वाटी तेल, हींग, मोहरी व जिरे फोडणी साठी , अर्धा वाटी ओले खोबरे व वरुन घालण्या साठी कोथींबीर व एक कांदा , चवीनुसार मीठ व चिंच गुळाचा कोळ.

कृती -- प्रथम शेगवाचा पाला ऊकळवुन त्याचे पाणी काठुन टाका , पालेल्यात तेल टाका व त्या मध्ये कांदा घाला व कांदा परतल्यावर मोहरी हींग व जीरे घाला व आले लसुण पेस्ट घाला व आता शेगवाचा पाला घालून परता व वालाचे भिरडे घाला , व मसाला ळ हळद घाला , भिरडे शिजल्यावर आवश्यक तेवढे पाणी घाला व मीठ व चिंच गुळ घाला , ही आमटी भात किंवा भाकरी बरोबर खाता येते.

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page