top of page

वालचे मुटके ( मुठीये)

  • Pravina Raut Purao
  • Nov 21, 2016
  • 1 min read

वालचे मुटके ( मुठीये)

वाला चे मुटके आ आमच्या पालघर डहाणू मधील एक पारंपरिक पदार्थ आहे . हा पदार्थ खासकरुन गौरीच्या नैवेद्धाला करतात

साहित्य ---- २०० ग्रॅम सोललेले वाल( डांळीब्या) , ४ चमचे आले लसुण पेस्ट , ५ ते ६ हिरव्या मिरच्या , वाटीभर कोथींबीर, हळद २ चमचे, ४ चमचे मसाला, २ चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ, २ चमचे तेल व ह्याय मावेल येवढे तादळाचे रवाळ पिठ, १ वाटी शेगदाणे , राई जिरे व कढींपत्ता फोडणी साठी

कृती ----- प्रथम अपातेल्यात तेल टाकून , त्या मध्ये फोडणीचे साहीत्य टाका , व परतल्यावर वालाचे बिरढे टाका , व त्या मध्ये शेगदाणे, मीठ , हळद , मसाला , व गरम मसाला टाका , व ऐक वाफ येऊद्या, व त्या मध्ये २ मोठे ग्लास पाणी टाका व ऊकळुन द्या, पाणी ऊकळल्यावर त्या मध्ये मावेल ऐवढे तादळाचे पीठ घाला व मोदका सारखी ऊकड काढा.

आता ऊकड थंड झाल्यावर हाताने मिक्स करा व त्याचे मुठीये वाळा व मोदक पात्रात ऊकडा हे थंड झाल्यावर त्याला फोडणी देऊनही खाता येतात .

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page