भरलेले खेकडे / Stuffed Crab
- Pravina Raut Purao
- Nov 21, 2016
- 1 min read
भरलेले खेकडे
श्रावण संपला गणपती गेले, म्हणून काल बाजारात गेले, औओळखीची कोळीण होती, म्हणाली ताई खेकडे घेऊन जा , ईच्छा नसताना ही घ्यावे लागले , पण खेकडे खुप ताजे व भरलेले होते , मुलगा म्हणाला मम्मी भरुन कर, मग का, मुलाची फरमाईश भरुन केले.
साहित्य ---- भाजारातुन खेकडे आडल्यावर त्याचे पाय तोडुन ते वाहत्या पाण्यात नळाखाली स्वच्छ धुवुन घ्यावे व आपली दुसरी तयारी होई पर्यत फ्रीजर मध्ये ठेवावे, म्हणजे ते लगेच मोकळे होतात . ५ ६ खेकडे , ४ चमचे आले लसुण व मिरची पेस्ट , ३ मोठे कांदे , वाटीभर सुके खोबरे, हळद , मीठ व घरचा लाल मसाला व २ चमचे चीकन मसाला १ लिंबाचा रस, ४ चमचे तेल, वरुन पेरण्या साठी कोथींबीर,
कृती -- प्रथम खेकडे व त्याचे पाय फ्रीज मधून काठुन घ्या. व बारीक पाय मिक्सरला वाटुन घ्या व मोठे डेगे थोडे ठेचुन घ्या जेणे करुन त्यात मसाला जाईल, खेकड्याचे दोन भाग करा व कांदा व खोबरे भाजुन वाटुन घ्या , ह्या मिश्रणात आले लसुण पेस्ट , मीठ , हळद , मसाला व चिकन मसाला व लिंबूरस घाला व मिक्स करुन खेकड्या मध्ये भरा व खेकडे दोरीने सौलसर बाधुन घ्या, आता पालेल्यात तेल गरम करत ठेवा व त्या मध्ये खेकडे ठेवा व वरून डेंगे व बारिक पायाचे पाणी घाला व ऊरलेला मसाला घाला, खेकडे लाल झाले की गँस बंद करा व भाकरी भात चपाती बरोबर खायला द्या.
