top of page

पोहा चिकन ( वाडवळ भाषेत) - भुजिंग / Bhujing

  • Pravina Raut Purao
  • Nov 21, 2016
  • 1 min read

पोहा चिकन ( वाडवळ भाषेत)

साहित्य -- २५० ग्रॅम चिकन, २ बटाटी, १५० ग्रॅम पोहे, १वाटी तेल , आल लहण न मीरश्या न कोथीबींरस वाटण ४ समसे, १कांदा, थोडा गरम मसाला, ४ ५ काळीमीरी, ४ ५ लंवगा, ४ ५ तज( दालचीनी) ये तुकडे,हळद १समसा , आपला घरसा मसाला ३ ४ समसे, वरसन टाकव्या हाटी थोडी कोथींबीर

कृती --- आदी चीकन धवुन साप हुक करुन घेव्या न त्याला मीठ, मसाला, हळद , न वाटण लावुन ठेव्या, बटाट गोल कापुन घेव्या न ते चिकन मन टाकव्या , ऐका टोपात तेल टाकुन त्यात कांदा परतव्या व त्यात काळीमीरी, तज न लवंग टाकव्या कांदा हीजल्यावर त्यात चिकन व बटाट टाकव्या न वाफेवर हीजव्या न मीठ टाकव्या वरसन गरममसाला टाकव्या न वरसन पोहे टाकव्या न कोथीबिंर टाकुन परत बाफ घेव्या आगाशी ला मिळते पण ते भट्टीत भुजतात .

गटारीया निमतान अह करुन पावा नक्की जकले बोट सुबुन खातील

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page