चिकन मसाला रस्सा / Chicken Rassa
- Bhumika Mhatre
- Nov 21, 2016
- 1 min read
चिकन मसाला रस्सा
साहित्य :अर्धा किलो चिकन तुकडे करून साफ केलेले, बटाटे हवेत तितके, 2 मोठे कांदे चिरून, 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, आले 1 इंच आणि लसूण पाकळ्या 7/8. वाडवळ मिक्स लाल मसाला 3 चमचे (रेसिपी वेगळी देत आहोत ती पाहावी) आणि लिंबू अर्धे.
रेसिपी:
तेलावर प्रथम कांदे तळावेत.
कांदे थोडे चोकोलेटी रंगाचे तळले गेले कि खमंग वास येतो ह्यावर अर्धा चमचा मीठ टाकून चिकन आणि बटाटयाचे तुकडे टाकून परतावे.
पाच मिनिट्स नि ह्यात वरील सर्व टाकून ढवळावे आणि झाकण ठेवून त्यावर पाणी टाकून शिजून द्यावे.
चवीनुसार मीठ टाकावे.
पंधरा मिनिट्स नि झाकण काढून त्यावरील पाणी आत टाकावे आणि शेवटी थोडे पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिट शिजवावे.
यात एक लिंबू चा रस पिळून मिसळावा.
शिजले कि त्यात वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून गरम गरम भात किंवा भाकरी बरोबर वाढावे.
