top of page

कोलंबी व वासता भाजी / Prawns & Bamboo shoots rassa

  • Pravina Raut Purao
  • Nov 21, 2016
  • 1 min read

कोलंबी व वासता भाजी

वासता म्हणजे बांबुचा कोवळा कोंब , तो फक्त पावसाळ्यातच मिळतो त्याच्या गोल गोल चकत्या बाजारात विकायता असतात. ह्याची भाजी, लोणचे , किंवा हे मिठाच्या पाण्यातही ठेवता येतात , काज आपण कोलंबी घालुन भाजी करुया.

साहित्य --- बांबुचे कोंब ऐक वाटा खाडीची कोलंबी , वाटीभर , आले लसुण व कोथींबीचे वाटण, मीठ , ३चमचे तेल, हळद, लालमसाला, व चिंचेचा कोळ

कृती --

  • प्रथम बांबुचे कोब ऊकळुन शिजवुन घ्यावे , कोलंबी साफ करुन घ्यावी, फोडणी न देता ही भाजी छान लागते , सर्व साहित्य ऐकत्र मिक्स करा व त्यातृ तेल व चिचेंच कोळ घाला व ऊकळल्यावर गॅस बंद करा.

  • भात भाकरी, किंवा चपाती बरोबर छान लागते .

  • ही भाजी शिळी झाल्यावर ही छान लागते नक्की करुन बघा.

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page