top of page

Green Chicken Curry

  • Priya (Lata) Thakur
  • Nov 21, 2016
  • 1 min read

हिरवे चिकन -

हे एक अत्यंत रुचकर आणि फार जास्त घटक ना टाकता करण्यासारखे अप्रतिम व्यंजन आहे.

माझ्या मम्मी 'पपा ची खास रेसिपी. ह्यात मसाले इतकं काहीही जास्त वापरले जात नाही. पण चव मात्र स्वर्गीय.

  • एक किलो चिकन असेल तर एक पूर्ण जुडी कोथिंबीर 7/ 8 पाने पुदिना ( हे नसले तरी चालतंय ) , 10 पाकळ्या लसूण , एक इंच आले , 20/ 22 काळीमिरी , तीन हिरव्या मिरच्या ह्यांचे वाटण करून घ्यावे.

  • 2 मोठे कांदे बारीक चिरून ठेवावेत, बटाटे हवेत तितके.

  • तेलावर प्रथम कांदे तळावेत.

  • कांदे थोडे चोकोलेटी रंगाचे तळले गेले कि खमंग वास येतो ह्यावर अर्धा चमचा मीठ टाकून चिकन आणि बटाटयाचे तुकडे टाकून परतावे.

  • पाच मिनिट्स नि ह्यात वरील वाटण आणि ढवळावे आणि झाकण ठेवून त्यावर पाणी टाकून शिजून द्यावे.

  • पंधरा मिनिट्स नि झाकण काढून त्यावरील पाणी आत टाकावे आणि शेवटी थोडे पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिट शिजवावे. चवीनुसार मीठ टाकावे.

  • यात एक लिंबू चा रस पिळून मिसळावा.

  • शिजले कि त्यात वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून गरम गरम भात किंवा भाकरी बरोबर वाढावे.

© 2016-2025 by मी चौंकळशी वाडवळ. Proudly created by भूमिका मयूर म्हात्रे (Bhumika Mayur Mhatre)

bottom of page