top of page

History : SKP Vaadvals

वसई विरार पासून डहाणू पर्यंत चा परिसर हा पुढील 12 समाजामध्ये विभागाला गेलाय:

1) ब्राह्मण

2) कुडाळ देशकर

3)सारस्वत

4) पानमाळी (सोमवंशी क्षत्रिय समाज )

5) भंडारी

6) शामेडी

7) पाळशे

8) आगरी

9) चांभार

10) कोळी

11) कुपारी किंवा कादोडी

12) सांडोरी ख्रिश्चन

वरील सर्व प्रकारांमधील अर्धी जनता पंधराव्या शतकात ख्रिश्चन धर्मांतरित झाली होती.


सोमवंशी क्षत्रिय / पानमाळी हिंदू वर्ण पद्धतीमध्ये दुसऱ्या वर्णातील म्हणजेच क्षत्रिय वर्गपद्धती आहे. "सोम" म्हणजे "चंद्र " म्हणजेच हे क्षत्रिय चंद्र वंशातील / चांद्र वंशी क्षत्रिय आहेत.

सोमवंशी क्षत्रिय म्हणजेच वाडवळ / पानमाळी / पाचकळशी / चौकळशी / पान भंडारी :


सोमवंशी क्षत्रियांचे सोपारा आणि माहीम ही महत्वाची ठिकाणे होती.

ह्यातही 4 प्रदेशांतून आलेल्या सोमवंशी क्षत्रियांचे वास्तव्य प्रामुख्याने होते.

1) उत्कल निवासी ( सध्याचे ओडिसा)

2) गुजरात निवासी (आन्हिलवाडी )

3) मगध निवासी

4) महिष्मती निवासी


1) सोमवंशी क्षत्रियांचा वेगळाच इतिहास आहे. सोमवंशी क्षत्रियांचा ज्ञात इतिहास हा ख्रिस्त पूर्व 2000 काळापासून मानला जातो. उत्कल नरेश ( सध्याचे ओडिसा) राजा गृहशाया शूर्पारक ( सोपारा) इथे राज्य करीत असे.

2) ख्रिस्त पूर्व 1400 मध्ये सोमवंशी मौर्य राजे शूर्पारक येथे राज्य करत असत तेव्हा त्यांनी काही सोमवंशी क्षत्रिय मगध प्रदेश येथून आणले (बिहार/पटना आणि आजुवाजुचा प्रदेश)

3) नंतर येथे महिष्मती चा राजा सुधन्वा आणि लाट ह्यांनी ख्रिस्त पूर्व 600 ते 200 राज्य केले. तेव्हा त्यांनी काही सोमवंशी क्षत्रिय महिष्मती येथून आणले (सध्याच्या मध्य् प्रदेशात)

4) इसवी सन 280 मध्ये तेलंगणा चे सोमवंशी यादव राजे रामचंद्र यादव यांचे राज्य शूर्पारक येथे सुरु झाले. यादवांचे राज्या तब्बल 900 वर्ष चालले इसवी सन 1071 पर्यंत. तेव्हा त्यांनी काही सोमवंशी क्षत्रिय तेलंगणा येथून आणले

5) नंतर इसवी सन 1138 ला दक्खन चे राजे गोवर्धन बिंब चालुक्य यांचा भाऊ राजे प्रताप बिंब चालुक्य ह्यांणी वैतरणाच्या उत्तरेकडून शूर्पारक वर आक्रमण केले आणि हा प्रदेश जिंकून घेतला. त्यांनी महिकावती हि जुनी नागरी नव्याने पुन्हा वसवली. दख्खन हुन आलेले सोमवंशी क्षत्रिय ह्या महिकावती नगरीत राहू लागले. (सध्याचे केळवे माहीम )

6) इसवी सन 1161 ला गुजरातचा आन्हिलवाड येथील सोमवंशी क्षत्रिय सेनापती अंबूद ज्याचे मूळ कुळ ओरिसा च्यासोमवंशी क्षत्रियाचे मानले जाते ह्याने मल्लिकार्जुन शिलाहार ह्याच्या राज्यावर आक्रमण केले आणि त्यासाठी तो सैन्यासह डहाणूका नदीवर वसला होता (डहाणू) पण त्याच वेळी मुस्लिमांनी आन्हिलवाड वर हल्ला केल्यामुळे हे सैन्य डहाणू येथेच राहिले जे पुढे वाडवळ म्हणून प्रसिद्ध झाले. ह्यांनीच यादव याना शिलाहाराचा पराजय करून उत्तर कोकण प्रदेश जिंकायला मदत केली आणि ह्याचसाठी यादवांनी कृतज्ञता आणि बक्षीस म्ह्नणून त्यांना डहाणू हा प्रदेश बहाल केला आणि तेथे स्थायिक करून घेतले. जे कोकणात जाऊन स्थायिक झाले ते पुढे "साष्टीकर" सोमवंशी चौकळशी म्हणून प्रसिद्ध झाले.

7) इसवी सन 1204 ला राजे बिंबदेव राणा ह्यांनी सोपारा, माहीम आणि डहाणू येथील सोमवंशी क्षत्रियांना त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि अजून प्रोत्साहनासाठी म्हणून सिंहासन वापरण्याचा हक्क आणि 5 कलश भेट म्हणून दिले. फक्त सोपाऱ्याचे सोमवंशी क्षत्रियांना जे कि ओरिसा च्या राजा सुधन्वा च्या राजघराण्याचे वंशज होते त्यांनाच फक्त लग्नामध्ये "पंच छत्र" वापरण्याची मुभा देण्यात आली.

अशाप्रकारे आपण बघितले कि हे सोमवंशी क्षत्रिय उत्कल (ओरिसा), महिष्मती(मध्य प्रदेश), दख्खन (तेलंगणा) आणि आन्हिलवाड (गुजरात ) येथून येऊन स्थायिक झालेत. पुढे या सर्वच सोमवंशी मध्ये रोटीबेटी व्यवहार सुरु झाला आणि हे सर्वच सोमवंशी किंवा वाडवळ (चौकळशी ) / पाचकळशी म्हटले जाऊ लागले.

यातील बरीचशी कुटुंबे जगद्गुरू शंकराचार्य याना आपला धार्मिक गुरु मानतात आणि वसई निर्मळ या ठिकाणी नेहमी भेट देत असतात.

आमच्या कुलस्वामिनी म्हणून आम्ही भुवनेश्वरी महालक्ष्मी / वज्राबाई (वज्रेश्वरी )/ एकविरा देवी / महिकावती माता ह्यांचे पूजन केले जाते.

  • जे भुवनेश्वरी महालक्ष्मी देवीचे कुलस्वामिनी म्हणून पूजन करितात ते उत्कल (ओडिसा) निवासी सोमवंशी क्षत्रिय होय.

  • जे माता वज्रेश्वरी देवीचे कुलस्वामिनी म्हणून पूजन करितात ते मगध (बिहार/पटना आणि आजुवाजुचा प्रदेश) आणि आन्हिलवाड (गुजरात ) निवासी सोमवंशी क्षत्रिय होय.

  • जे एकविरा देवीचे कुलस्वामिनी म्हणून पूजन करितात ते दख्खन (तेलंगणा) / देवगिरी / मुंगी पैठण निवासी सोमवंशी क्षत्रिय होय.

  • जे माता महिकावती देवीचे कुलस्वामिनी म्हणून पूजन करितात ते महिष्मती (मध्य प्रदेश) निवासी सोमवंशी क्षत्रिय होय.

बहुतेक करून सोमवंशी क्षत्रिय आडनावं हि पुढीलप्रमाणे आहेत - ठाकूर , राऊत , चौधरी , सावे , घरत, म्हात्रे (महापात्रा पासून म्हात्रे आडनावं आलंय - उत्कल ओडिसा वंशज ) हि सोमवंशी क्षत्रियांच्या सहा प्रमुख घराणी आहेत.

  • ह्या पैकी फार पूर्वी ठाकूर हे माहीम येथे स्थायिक होते.

  • राऊत हे बाजीपूर (वसई) येथे

  • चौधरी सोपारा येथे

  • महापात्रा - म्हात्रे हे निर्मल येथे

  • तर सावे आणि घरत हे केळवा येथे होते

  • कालांतराने ह्यातील काही घराणी वेगळी झाली आणि त्यांची आडनावे वर्तक , पाटील याप्रमाणे झाली.

  • जी लोके मुंबई ला स्थलांतरित झाली त्यांना चुरी हे आडनाव मिळाले.


VasaiVirar till Dahanu area has basically 12 communities: 1)Brahmins 2)Kudal Deshkars 3)Saraswats 4)Panamali (Somavanshi Kshatriya Samaj) 5)Bhandari (Seshavanshi Kshatriya Samaj) 6)Shamedi 7)Palshe 8)Aagri 9)Chambhar 10)Koli 11)Kupari of Kadodi 12)Sandori

Christians In all the above 12 communities half the population was converted to Christianity around 1570 A.D. Somvanshi Kshatriya/ Panmali Vocabulary The word "Somavanshi Kshatriya" means the 2 nd caste in the hierarchy of the Hindu Varna System."Soma" means "Moon" , thus these kshatriyas belong to the "Chandra Vansha" i.e. "'Moon Dynasty of Warriors".

Somavanshi Kshitriya Alias. Vadval/Pachkalshi/Panmali/Paan Bhandari: Sopara and Mahim are said to be the land of confluence of the Somavanshi Kshatriya clan, one from Utkala and other from Gujarat and still other from Magadha and Mahishmati. The Somavanshis have a unique history.

1)The history of Somavanshis in Vasai date back to B.C.2000 to the rule of Utkal (now Orissa) Naresh Guhashaya. Raja Guhashaya ruled Shurparak during 2000 B.C. Since then Shurparak was the place ruled by able Kshatriyas of Somvansha.

2) Later during 14 th century B.C. Somavanshis Maurya clan ruled Sopara , thus bringing in some Somvanshi Kshatriyas from Magadha Pradesha.

3)Later the clan of Somavanshi Raja Sudhanva of Mahishmati and Laat ruled Sopara from B.C.600 to B.C.200. Thus some Somavanshi families from Mahishmati too came to Sopara.

4) Later around 280 A.D. Ramachandradev Yadav of the Somavanshi Yadav Clan of Telangana start rule in Shurparak. Now the Yadav rule starts and lasts till 1071 A.D. for around 9 centuries. During this rule many Telangana Somavanshi Kshatriyas migrated to Sopara.

5) Later around 1138 A.D., King Pratap Bimba Chalukya, brother of Govardhan Bimba, of the Somavanshi Kshatriya clan from Dekkhan raids Shurparak from northern side of Vaitarana. Captures Shurparak and remakes the old city of Mahikavati i.e. Kelve Mahim. Thus Somavanshi Kshatriyas from Dekkhan starts residing in Shurparaka (Sopara), but mainly in Mahim.

6) Around 1161 A.D. Senapati Ambud, a Somavanshi Kshatriya from Gujarat, from Anhilvaad, whose lineage runs back to orissa somavanshis, tried to attack Mallikarjun Shilahaar and for this settles near Dahanuka river (Dahanu).At the same time Mohamedeans attack Anhilvaad and thus the somavanshi sena stays near Dahanuka, later called Vadval .They help Yadavs to conquer North Konkan and defeat Shilahaaras. In return Yadavs accommodate these Somavanshi kshatriyas in Dahanu.

7) Raja Bimbadev Rana in 1204 A.D. gift the Simhasan and 5 Kalashis to the Somavanshi Kshatriyas of Sopara, Mahim and Dahanu as a mark of encouragement to Kshatriyas. But the Somavanshis of Sopara, who belonged to the royal clan of Samrat Sudhanva were only allowed to carry “Panchachattris” on their heads during marriage. Thus we carried Somavanshi Kshatriyas from Utkala, Magadha, Mahishmati, Dekkhan, and Anhilvad(Gujarat).

Later all these Somavanshi Kshatriya clan got united and there started the marriages between the Somavanshis of Sopara, Mahim and Dahanu. Thus now all of them are called either Somavanshis , Vadval or Panchkalshis.

All of them consider Jagadguru Shankaracharya as their traditional Guru and visit Nirmal often.

They worship Goddess Bhuvaneshwari Mahalakshmi or Vajrabai (Vajreshwari) or Ekvira Devi or Mahikavati Mata as their Kulaswamini.

  • Those who worship Bhuvaneshwari Mahalakshmi belong to the Somavanshi Clan of Utkala (Orissa).

  • Those who worship Vajreshwari Mata belong to Magadha and Anhilvad.

  • Those who worship Ekvira Mata are descendants of Dekkhan Somavanshis belonging to Devgiri or Mungi Paithan.

  • Those who worship Mahikavati Mata are descendants of Mahishmati’s Somavanshis.

Normally the surnames of Somavanshis are Thakur, Raut, Chaudhari, Mahapatra (Mhatre), Save (Saave) and Gharatha.

These are the six important families of Somavanshi Kshatriyas.

  • Thakurs were locatedin Mahim,

  • Rauts in Bajipur,

  • Chaudhari’s in Sopara,

  • Mahapatra (Mhatre) in Nirmal region,

  • Saave in Kelva.

Later some of these clans were segregated and were named as Vartak, Patil and those who went to Mumbai region were called Churi.

Now this community is engaged in business of flowers, agriculture and jobs in Mumbai region. Many Somvanshi women are employed as teachers in various BMC School and Zilla Parishad Schools.

The present generation has acquired higher educational qualifications and are more and more of them are preferring jobs abroad.

The prominent people of this community include Padmashri Bhausaheb Vartak and the present politician Hitendra Thakur who has been consecutively been the MLA of Vasai Taluka since last 15 years. The present new trend in Somvanshi community is that , since they are called “Panmalis”, they have started acquiring OBC Reservation facilities of the Government.

Thus Somavanshis were customarily and historically very nice and cultured.

bottom of page